मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (11:08 IST)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वर भीषण अपघातात तीन ठार, तर 15 जखमी

Three killed
पुणे -मुंबई एक्स्प्रेस वर बोरघाटात मध्यरात्री बसचा अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. 
मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा टँकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी उभा होता. मुंबईच्या दिशेने वेगाने येणारी खासगी बस या टँकर ला धडकली.  या पाठोपाठ दोन अन्य वाहने देखील या बसला जाऊन धडकली. या अपघातात रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांपैकी तिघांचा मृत्यू झाला. या धडकेत बस चालक गंभीर जखमी झाला असून 15 बस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. 
अपघाताची माहिती मिळतातच मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.