1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (15:25 IST)

कडबनवाडीत शिकाऊ विमान कोसळले, वैमानिक जखमी

Training plane crashes
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात महिला वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. सकाळी नेहमीप्रमाणे बारामती येथून विमानाने उड्डाण घेतले. मात्र त्यानंतर हे विमान इंदापूर येथील कडबनवाडी परिसरात आल्यावर त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड उद्भवला आणि काही समजण्याच्या आतच विमान परिसरातील एका शेतात कोसळले. यावेळी  शेतामध्ये असलेल्या नागरिकांनी महिला वैमानिक भावना राठोड यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.