शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (16:51 IST)

तृतीयपंथींचं धुमधडाक्यात लग्न

marriage
पिंपरी चिंचवड महापालिकेत नियुक्त झालेल्या एका ट्रान्सजेंडर जोडप्याचे धुमधडाक्यात विवाह झाला. आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यावर आधार वाटला. समाजात आम्हाला वेगळ्या नजरेनं बघतात मात्र एक नजर मला आयुष्यभरासाठी स्वीकारताना दिसली. शिवाय मी आहे तसं स्वीकारताना दिसली. प्रेम वगरे असतं मात्र आम्ही दोघे एकमेकांचा पार आदर करतो. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, असं तृतीयपंथी सुरक्षा रक्षक रुपा टांकसाळ सांगत होत्या. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचा विवाह पाहिला असेल मात्र पिंपरी चिंचवडमध्ये समाजाला वेगळा आरसा दाखवणारा विवाह पार पडला. सुरक्षा रक्षक रुपा टांकसाळ आणि ग्रीन मार्शल प्रेम संतोष लोटलीकर असं या तृतीयपंथी जोडप्याचं  नाव आहे. रुपा बुलढाण्याची तर प्रेम रत्नागिरीचे आहेत.