कृती : सोया सॉस, चिली सॉस, विनेगर व साखर एकजीव करून घ्यावे. काकडी, गाजर व सिमला मिरचीचे लांब लांब पातळ काप करावे. कांदा, लसूण चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात लसण टाकून नंतर भाज्या व कांदा घालून प्रखर आचेवर 2-3 मिनिट परतून काढावे. सॉस घालून 2-3 मिनिट अजून परतून घ्यावे. मीठ व अजीनोमोटो घालून 2 मिनिटाने खाली उतरवून घ्यावे.