कृती : उडीद डाळ 2 तास भिजून ठेवावी. नंतर त्याला चांगली बारीक वाटून घ्यावी, मग त्यात मीठ, जिरं, आलं, हिरव्या मिरच्या टाकून मिश्रणाला एकजीव करून त्याचे एकसारखे गोळे बनवावे. कढईत तेल गरम करून गोळ्यांना सोनेरी होईस्तोर तळावे, तळायच्या आधी त्यात मधोमध एक छिद्र पाडावे. तळलेल्या गोळ्यांना थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवावे. दह्यात साखर, मीठ, जिरं पूड, शेंद मीठ तिखट टाकून एकजीव करावे. भल्लांचे पाणी काढून दह्यात टाकावे. वरून कोथिंबीर, तिखट, जिरं पूड, हिरवी चटणी व चिंचेची चटणी टाकून सर्व्ह करावे.