कृती : अदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात चिमूटभर सोडा घालून चणे भिजत ठेवावे. सकाळी त्याच पाण्यात तमालपत्र, वेलची, मिरे घालून चणे शिजवून घ्यावे. कांदे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून घ्यावात. लवंग, दालचिनी, धने, जिरे, शाहजिरे या मसाल्याची पूड करून घ्यावी. उरलेला मसाला, वेलची, मिरे व तमालपत्र तुपावर परतावे. नंतर त्यात कांदा घालून परतावे. दोन मिनिट टोमॅटो घालून हलवावे. टोमॅटोच्या सुटलेल्या रसात हळद, तिखट, मसाला पावडर, दोन चमचे बारीक कुटलेला अनारदाणा घालावा. 3 मिनिटाने त्यात शिजलेले छोले, मीठ, गूळ पाणी घालून गॅसवर शिजत ठेवावे. उकळून दाटसर झाल्यावर खाली उतरवून कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम छोले भटुर्यासोबत सर्व्ह करावे.