Marathi Recipe, Marathi Punjabi Pakkruti | मराठी पाककृती : कोबीचे वडे
साहित्य - कोबी - १ वाटी किसुन घ्यावा, कांदा - १ मोठा किसलेला, कोथिंबीर - आर्धा कप बारीक चिरलेली, डाळीचे पीठ - २ वाटी, साखर चवीनुसार, गरम मसाला पावडर - १/२ टी-स्पून, हिरव्या मिरच्या - ४ ते ५, मीठ, हळद, जिरे, तेल - मोहनासाठी १ टी-स्पून व तळण्यासाठी आवश्यकतेनुसार, लिंबू १/२, हिंग - चिमूटभर. कृती- सर्वप्रथम कोबी व कांदा किसून घ्यावा त्यात मिरच्या, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, जिरे, डाळीचे पीठ सर्व साहित्य एकत्र करावे, त्यावर लिंबू पिळावे. पाणी वापरू नये. कोबी, कांदा व कोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. सरसरीत पीठ करून घ्यावे व हाताच्या तळव्यांना किंचित तेल लावून डाळ व वडय़ाप्रमाणे छोटे-छोटे चपटे वडे करून घ्यावेत. गरम तेलात भज्यांप्रमाणे कोबीचे वडे तळावेत आणि गरम सव्र्ह करावे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा