- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - पंजाबी ढाबा
मिश्रित डाळींचे वरण
साहित्य : 25-25 ग्रॅम उडीद, मसूर, हरबरा, तूर व मूग डाळ, 2 कांदे- टोमॅटो बारीक चिरलेले, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा अमचूर पूड, 1 चमचा आलं-लसणाचे पेस्ट, तेल, मीठ चवीनुसार. कृती : सर्वप्रथम सर्व डाळींना स्वच्छ धुऊन भिजत ठेवावे. कुकरामध्ये तेल गरम करून त्यात चिरलेले कांदे व टोमॅटो घालून परतावे त्याच सोबत आलं-लसणाचे पेस्ट टाकून गुलाबी होईपर्यंत परतावे. नंतर त्यात तिखट, हळद, मीठ, अमचूर टाकून सर्व डाळी त्यात टाकून पाणी टाकावे व 10 मिनिट शिजवावे. वरण तयार झाल्यावर त्यात गरम मसाला टाकावा.