Last Modified: नवी दिल्ली (पीआयबी) , शुक्रवार, 3 जुलै 2009 (16:37 IST)
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना अधिक सुविधा
ममता बॅनर्जी यांनी आपल्या अर्थसंकल्पात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना अधिक सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनीही अशाच स्वरूपाची घोषणा केली होती. त्यांचीच री ओढत आज ममतांनी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मनोरंजनासाठी खास सुविधा करणे तसेच ऑन बोर्ड सूचना फलक (डिजीटल) लावण्यात येईल असे ममतांनी म्हटले आहे.
यासह या गाड्यांमध्ये एक डॉक्टरही नियुक्त करण्यात येणार असून, चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता, भुवनेश्वर, दिल्ली, हैदराबाद, मुंबई या शहरातील स्थानकांमध्ये रुग्णवाहिकांची सेवा देण्यात येणार आहे.