गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (11:49 IST)

लसूण आणि कांदा न वापरता नवरात्रीत बनवा पनीरची भाजी; सोपी पाककृती

paneer vegetable
साहित्य-
पनीर - 200 ग्रॅम 
टोमॅटो -तीन मध्यम 
काजू - दहा  
ताजे दही - १/४ कप 
मलई (क्रीम) - दोन टेबलस्पून  
बटर - दोन टेबलस्पून
तेल - एक टेबलस्पून
आले - एक इंच  
हिरवी मिरची 
तिखट - एक टीस्पून  
धणे-जिरे पूड- एक टीस्पून
हळद - १/४ टीस्पून
गरम मसाला - अर्धा टीस्पून
कसूरी मेथी - एक टीस्पून 
जिरे -अर्धा टीस्पून
तमालपत्र -एक 
दालचिनी - एक छोटा तुकडा
लवंग -दोन 
हिंग 
कोथिंबीर 
मीठ चवीनुसार
पाणी  
कृती-
सर्वात आधी पनीरचे चौकोनी तुकडे करा. आता टोमॅटोची प्युरी तयार करा. आता भिजवलेले काजू मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. यामुळे ग्रेव्हीला क्रीमीपणा येईल. आता कढईत 1 टेबलस्पून बटर आणि 1 टेबलस्पून तेल गरम करा.त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि हिंग घाला. मसाले परतून त्यांचा सुगंध येईपर्यंत तळा. आता किसलेले आले आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. व एक मिनिट परतवा. आता टोमॅटो प्युरी घाला आणि मध्यम आचेवर शिजवा, जोपर्यंत तेल सुटू लागत नाही. तसेच काजू पेस्ट आणि दही घाला. चांगले मिसळा. आता हळद, लाल मिरची पावडर, धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. तसेच दोन मिनिटे शिजवा. आता आवश्यकतेनुसार दीड कप पाणी घालून ग्रेव्हीला इच्छित जाडी द्या.नंतर पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. आता पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घाला. हलक्या हाताने मिसळा आणि दोन मिनिटे शिजवा, जेणेकरून पनीर मसाल्याचा स्वाद घेईल. तसेच कसूरी मेथी चुरून घाला आणि गरम मसाला शिंपडा.नंतर एक मिनिट शिजवून गॅस बंद करा.शेवटी मलई आणि उरलेले बटर घाला. व कोथिंबिरीने गार्निश करा. चला तर तयार आहे आपली पनीरची भाजी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik