रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 11 जून 2022 (15:21 IST)

अपक्षांना आपल्या बाजुने करण्यात भाजप यशस्वी, निकालाने धक्का बसला नाही: शरद पवार

sharad pawar
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात ठेवून भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचीच रणनीती कामाला आली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
पुणे येथे शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना म्हटले की, राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.