Raksha Bandhan 2022 रक्षा बंधन कधी आहे? जाणून घ्या रक्षाबंधनचा मुहूर्त
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये रक्षाबंधनाचा सण गुरूवारी 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर रक्षा सूत्र बांधते आणि भाऊ तिची रक्षा करण्याचा वचन देतो. हा सण भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी हे खास योगायोग
या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ योगायोग निर्माण होत आहेत. यंदा आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि रवियोग राखीच्या दिवशी तयार होत आहेत. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 03.32 वाजता आयुष्मान योग राहील. यानंतर सौभाग्य योग सुरू होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ योगांमध्ये केलेल्या कार्यामुळे यश आणि सन्मान प्राप्त होतो. यासोबतच सुख-समृद्धीही असते.
रक्षाबंधन 2022 मुहूर्त Raksha Bandhan 2022 Muhurat
पंचांगानुसार 2022 मध्ये रक्षाबंधनाचा सण गुरूवारी 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 38 मिनिटे पासून सुरू होईल. तर शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07 वाजून 05 मिनिटापर्यंत राहील. त्यामुळे 11 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 08 वाजून 51 ते रात्री 09 वाजून 17 पर्यंत रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त असेल. तसेच रक्षाबंधनासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ - 05 वाजून 17 ते ते संध्याकाळी 06 वाजून 18 पर्यंत असेल.
रक्षासूत्र बांधताना या मंत्राचा जप करावा-
ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामभि बध्नामि रक्षे मा चल मा चल।