Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या देहाचा

Updated: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (17:27 IST)
 
सीतेच्या अग्नी परीक्षेनंतर जेव्हा प्रजेने सीतेबद्दल ही अफवा फैलावणे सुरू केली की रावणाकडे राहिल्यानंतर सीता अपवित्र झाली आहे. तरीही रामाने तिला महालात ठेवले आहे. रामापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तर त्यांना फार दुख झाले आणि त्यांनी सीतेला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाने जेव्हा सीतेला जंगलामध्ये सोडले तेव्हा ती गर्भवती होती. तेथे ती ऋषी वाल्मीकीच्या आश्रमात राहत असून तिने दोन मुलांना लव व कुश यांना जन्म दिला.
 
रामाने जेव्हा राजसूय यज्ञाचे आयोजन केले तेव्हा लव कुशने रामायणाचे गायन केले. तेव्हा श्रीरामाला जाणीव झाली की सीता पवित्र आहे आणि त्यांनी ऋषींचा सल्ला घेऊन सीताच्या परीक्षणाचे निर्णय घेतले. सीतेने ते स्वीकार केले.
 
सीतेने या वेळेस देह सोडण्याचा निर्णय घेऊन पृथ्वीशी प्रार्थना केली. हे माते मी कधीही रामाशिवाय कोणाचा स्पर्श केला नसावा. आपले सतीत्व भंग केले नसतील तर तू मला तुझ्यात सामावून घे. तेव्हा धरती फाटते आणि सीता त्यात सामावून जाते.
 
जेव्हा अवतारांची वेळ पूर्ण झाली तेव्हा रामाशी भेटायला काळ आला. काळ अर्थात वेळेचा देवता. काळने रामाला म्हटले की त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे आणि ते फक्त आमच्या दोघांमध्येच राहील म्हणून जे कोणी आमच्या गोष्टी ऐकतील तुम्ही त्यांचे वध करून द्या.
 
रामाने त्यांन शब्द पाळण्याचे वचन दिले. रामाने लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे केले आणि तेवढ्यात तेथे ऋषी दुर्वासा आले. त्यांनी लक्ष्मणाला रामाची भेट घ्याची असल्याचे सांगितले तेव्हा लक्ष्मण दुर्वासाच्या श्रापाच्या भितीने रामाच्या खोलीत गेले आणि दुर्वासा ऋषीच्या येण्याचे वृत्त दिले. त्यानंतर रामाने आपण दिलेल्या वचनाखातर लक्ष्मणाचा परित्याग केला. 
 
रामाने परित्याग केल्यावर लक्ष्मणाने दुखी होऊन सरयू नदीच्या काठावर आपले प्राणवायू थांबवले आणि सशरीर स्वर्गात गेले. या प्रसंगामुळे राम फारच दुखी झाले त्यांनी लव कुशाचे राज्याभिषेक केले आणि काही काळानंतर सरयू नदीत आपले देह त्यागले.

सर्व पहा

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments