यावं वाटते पुनः "रामराज्य" रे रामा
मर्यादा शिकवाया, जन्म तुझा जाहला,
मातृप्रेम कसं असावं, चरणी तिच्या जीव वाहिला,
कर्तव्यतत्पर पुत्र म्हणून पत्करला वनवास,
आदर्श शिष्य तूच असशी, गुरूचा रे खास,
प्रजा प्रेमी राजाराम, समानच तुझा न्याय,
हनुमंता चा "राम"तू रे,ह्रदयी तूच वसलाय,
राम जानकी जोडप, डोळ्याचे पारणे फेडी,
भरत लक्ष्मणा समान, बंधू ची असावी जोडी,
यावं वाटते पुनः "रामराज्य" रे रामा,
जीवन व्हावं "राममय",वर्णावा तव महिमा!
...अश्विनी थत्ते