बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|

आयबीएमचा 2800 कर्मचाऱ्यांना नारळ

अमेरिकेतील मंदीच्या आवर्तात आता आयटी क्षेत्रातील बडी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन (आयबीएम) सापडली आहे. मंदीचा फटका बसलेल्या या कंपनीने 2800 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला आहे. आयबीएमचे प्रवक्ते डग शेल्टन यांनी या वृत्तास पुष्टी दिली आहे.

कंपनीने गेल्या आठवड्यात या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाण्यास सांगितले. मात्र, किती कर्मचाऱ्यांना असे सांगितले याविषयीची नेमकी माहिती कळू शकली नाही.

कालचा सोमवार युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांसाठी काळा सोमवार ठरला. कारण या दोन्ही खंडात तब्बल 67 हजार जणांच्या नोकऱ्या या दिवशी गेल्या.

आयबीएमच्या प्रत्येक विभागातून समानतेने नोकरकपात करण्यात आली. सॉफ्टवेअरसह सेल्स व वितरण या विभागतही कपात झाली. यापुढे कंपनीच्या सॉफ्टवेअर विभागातूनही नोकरकपात होण्याची शक्यता आहे.

कंपनीने मंदीमुळे ही नोकरकपात केल्याचे आयबीएमने मान्य केलेले नाही. कंपनी गरजेप्रमाणे वेळोवेळी नोकरकपात करते आणि नवी भरतीही करते, असे सांगण्यात आले.