गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (11:03 IST)

गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा, प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी एका वर्षांसाठी शिथिल

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा साठा असलेल्या मूर्तिकारांना केंद्राने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर असलेली बंदी एका वर्षांसाठी स्थगित केली गेली आहे. 
 
करोनामुळे विविध क्षेत्रांचे आर्थिक नुकसान झाले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा साठा असलेल्या मूर्तिकारांना या बंदीचा फटका बसणार आहे. त्यामुळे बंदीचा निर्णय एका वर्षांसाठी प्रलंबित ठेवला आहे.
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने थर्माकॉल, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टिकपासून मूर्ती बनवण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. प्रदूषण होऊ नये म्हणून मातीच्या मूर्ती बनवण्यावर भर द्यावा, असे प्रदूषण मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, मूर्तिकारांकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचा साठा करून ठेवल्याने हा निर्णय तातडीने अमलात आणणे अवघड असल्याचे लक्षात घेत एका वर्षांसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटवण्यात आली आहे.
 
करोनाच्या संकटात मूर्तिकारांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे.