बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:36 IST)

काय म्हणता, फॅन्सी नंबरप्लेटमुळे चक्क १० हजार दंड

नागपुरमध्ये फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या एका बुलेट चालकाला पोलिसांनी चक्क 10 हजार 300 रुपयांचा दंड ठोकला आहे. हा बुलेट चालक नियमांचं उल्लंघन करत असल्याची तक्रारी वाहतूक पोलिसांना अनेकदा मिळाली त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
 
“आदत बुरी नहीं हैं, बस शौक थोडे उचें हैं” अशा आशयाची नंबर प्लेट लावून मिरवत होता. पोलिसांनी ज्यावेळी या गाडीचे अवलोकन केले, त्यानंतर वाहन चालकाने कोणते-कोणते नियम मोडले आणि याचा दंड किती होईल याचा हिशोब केला. तेव्हा दंडाची रक्कम चक्क 10 हजार 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली. या वाहन चालकाला जुन्या मोटार वाहन कायद्या प्रमाणे दंड करण्यात आला आहे.