बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सोलापूर , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (16:10 IST)

सोलापूर-नागपूर एक्सप्रेस 30 मार्चपर्यंत धावणार

सोलापूरनागपूर प्रवास करणार प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर- नागपूर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीचा अवधी तीन महिन्यांनी वाढविणत आला असून ही विशेष गाडी 30 मार्चपर्यंत धावणार असल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यस्थापक प्रदीप हिरडे यांनी बुधवारी दिली.
 
गाडी क्रांक 02111/ 02112, 02113/ 02114 सोलापूर- नागपूर- सोलापूर या विशेष साप्ताहिक गाड्या 20 डिसेंबर ते 13 जानेवारी 2020 या कालावधीसाठी सोडण्यात आल्या होत्या. या गाड्यांना पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून या गाड्या 30 मार्च पर्यंत धावणार आहेत.
 
सोलापूर स्थानकाहून नागपूरला दर रविवारी आणि गुरुवारी धावणारी गाडी आता 29 मार्चपर्यंत तर नागपूर स्थानकाहून सोलापूरला दर सोमवारी आणि शुक्रवारी धावणारी गाडी आता 30 मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीस 2 ब्रेकान, 3 जनरल, 10 स्लिपर, 2 एसी थ्री टीयर, 1 एसी टू टीयर असे एकूण 18 कोचेस आहेत. तरी या विशेष गाडीचा लाभ प्रवाशांनी घवा, असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाचवतीने करण्यात आले आहे.