शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (17:52 IST)

जिल्हा परिषद निवडणुक : नागपुरात भाजपला धक्का

राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का बसला आहे. तर नागपुरात महाविकासआघाडीने बाजी मारत जोरदार मुसंडी मारली आहे. तर नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजप पुढे आहे. 
 
नागपूरमध्ये गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत. दरम्यान, धुळ्यात भाजपनं मुसंडी मारलीय. आमदार जयकुमार रावल यांच्या मतदार संघात १० पैकी ८ ठिकाणी भाजपनं विजयी आघाडी घेतली आहे.