दहावी-बारावी निकाल २०२६: निकालाची तारीख जाहीर? शिक्षण मंडळाकडून मोठी अपडेट समोर
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाकडे खिळल्या आहेत. बोर्डाचा निकाल कधी लागणार या बाबत महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल लवकरच लागेल असे सांगितले जात आहे. निकाल पुढील २ ते ३ आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे सूत्राने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा १ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान इयत्ता १० वी आणि १२वी च्या परीक्षा घेतल्या होत्या. आता पालक आणि विद्यार्थी उत्सुकतेने निकालाची वाट बघत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इयत्ता १२ वी चा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १० वी चा निकाल १२ वी च्या निकालाच्या १० ते १२ दिवसांत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर अद्याप मंडळाकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही.
Edited By - Priya Dixit
