मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:07 IST)

काय म्हणता, दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता

दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे  उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे. 
 
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.