1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:05 IST)

राज्यातील 11 हजार 549 एस टी कर्मचारी कामावर हजर

राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर हजर झाले.  राज्यातील 11 हजार 549 एस टी कर्मचारी कामावर हजर झाले. एसटी महामंडळाच्या हजेरी पटावर एकूण कर्मचारी संख्या 92 हजार 266 इतकी आहे. चालक, वाहक, कार्यशाळा आणि प्रशासकीय विभागातील एकूण 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर होते. एस टी महामंडळानं ही माहिती दिली. 
वसईत पहिली एसटी बस धावली. एकूण पाच बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या. वसई स्टेशन ते वसई गाव या मार्गावर एसटीची सेवा सुरु करण्यात आली.  विरार आणि नालासोपारा आगारातून एकही एसटी बस रवाना करण्यात आलेली नाही. वसई आगारात 262  कर्मचा-यांपैकी 32 कर्मचारी सेवेवर हजर झाले. 
राज्य सरकारच्या आवाहनानंतर यवतमाळ विभागातील 219 कर्मचारी कामावर रुजू झालेत. कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही चालक आणि वाहक नसल्यानं एसची सेवा ठप्प आहे. दरम्यान जिल्ह्यातील 105 संपकरी एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले असून 118 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
सोलापुरात अजूनही एसटी कर्मचारी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळं एसटी डेपोतून फक्त दोन बसेस धावल्या. सोलापूर मोहोळ मार्गावर या दोन एसटी रवाना झाल्या. सोलापूरात निलंबित झालेले एसटीचे वाहक आणि चालक कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती मिळत आहे.