सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:15 IST)

मी आणि चंद्रकांत दादा पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला दिल्लीमध्ये आलो आहोत : फडणवीस

दिल्लीतील भाजप मुख्यालयात निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवी संघटनात्मक बांधणीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन ते चार तास सुरू होती. दरम्यान, कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलंय मला माहिती नाही. मी आणि चंद्रकांत दादा भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला दिल्लीमध्ये आलो आहोत. आमचे संघटनमंत्री बीएल संतोष, शिवप्रकाश, सीटी रवी, मी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात संघटनात्मकतेची पुढची वाटचाल आणि आढाव्या संदर्भात बैठक झाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आहेत. परतु संघटनात्मकेची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सकाळपासून तीन ते चार तास आम्ही त्याच बैठकीमध्ये होतो. संघटनात्मकतेची पुढची वाटचाल आणि आढाव्या संदर्भात ही बैठक होती. त्यामुळे त्या व्यतिरिक्त आमचा काहीही वेगळा अजेंडा नव्हता. असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.