शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (11:42 IST)

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे 15 खासदार शिंदे गटात !

uddhav thackeray
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
 
त्यानंतर ही अजून आमदारांसह अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. सूत्रांप्रमाणे दोन तृतीयांश खासदार शिंदे गटात सामील होऊ शकतात. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाली यात शिवसेनेचे 15 खासदार उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.