रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नोकरीच्या बहाण्याने महिलेला 17 लाखांची फसवणूक, टेलिग्राम अॅपवरून संपर्क

ऑनलाइन नोकरीच्या ऑफरला बळी पडून नवी मुंबईतील एका 33 वर्षीय महिलेला 17 लाख रुपये गमवावे लागले. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दोन अज्ञात व्यक्तींनी नवी मुंबईतील कामोठे भागातील पीडितेशी टेलिग्राम अॅपद्वारे संपर्क साधला होता.
 
ऑनलाइन काम करण्याची ऑफर
आरोपीने महिलेला वेबसाइटवर ऑनलाइन आणि घरबसल्या कामाची ऑफर दिली आणि मोठ्या रकमेचे आश्वासनही दिले. नोकरीचे आमिष दाखवून दोन्ही आरोपींनी 9 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान महिलेकडून 17,000 रुपये घेतले. अधिकारी म्हणाले की, काम संपल्यानंतर पीडितेने तिची कमाई आणि तिने दिलेले पैसे देण्याची मागणी केली असता आरोपीने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर संपर्क तुटला.
 
अद्याप अटक नाही
आरोपीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महिलेने सोमवारी नवी मुंबईतील सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.