गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (21:12 IST)

टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल…

suicide
नाशिक : सिन्नर तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आ त्म ह त्या केल्याचा प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
 
या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात तिला आ त्म ह त्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘त्या’ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.
वैष्णवी नवनाथ जाधव असे आ त्म ह त्या केलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. ती शहा गावातील श्री भैरवनाथ हायस्कूल येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणाऱ्या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघा तरुणांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट साईट सांगून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली होती.
गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे व शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर छताला गळफास घेऊन आ त्म ह त्या केली.
शाळेच्या गणवेशातील लेगीज पॅन्ट फाडून तिने दोरी बनवली व घरातील छताला गळफास घेऊन आ त्म ह त्या केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला.
वैष्णवी, तिचा लहान भाऊ योगेश व चुलता घराच्या बैठक खोलीत झोपायचे. तर आई वडील बाजूच्या खोलीत झोपायचे. भाऊ योगेश हा पिठाच्या गिरणीत उशीर झाल्याने तेथेच थांबला होता.
 
वैष्णवी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने जालिंदरने नवनाथ व वहिनी सुनीता यांना उठवले. या सर्वांनी दरवाजा उघडण्यासाठी वैष्णवीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद येत नसल्याने जालिंदरने पहारीच्या साह्याने दरवाजा तोडला.
 
यावेळी वैष्णवी ने गळफास घेऊन आ त्म ह त्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गावातील स्थानिक डॉ. निलेश शिरसाठ यांनी तपासून वैष्णवी मृत झाल्याचे सांगितले.
त्यानंतर जाधव कुटुंबीयांनी आपले नातलग व मित्र परिवाराला याबद्दल माहिती दिली. नातेवाईकांनी वावी पोलीस ठाण्यात कळवत मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला.
वैष्णवीने आ त्म ह त्या केली त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे.
हे तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले.
शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आ त्म ह त्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत होता.
 
दरम्यान, या प्रकाराची माहिती समजल्यावर रात्री वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहा येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती व तिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी या आधारे पोलिसांनी रात्रीच तिघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले होते.
त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळी दोडी येथील रुग्णालयात शहा गावातील ग्रामस्थ व तरुणांनी मोठी गर्दी केली होती. सहाय्यक निरीक्षक श्री. लोखंडे हे स्वतः शवविच्छेदन कक्षात थांबून होते.
चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार केले जातील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दुपारी साडेतीन वाजता वैष्णवीच्या वडिलांची फिर्याद पोलिसांनी
वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर व एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तोपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारात थांबून होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात शहा येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.