रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (07:48 IST)

जमिनीसाठी झालेल्या वादातून उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा केला खून

murder
लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली आहे.  मोठ्या भावासोबत जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने टोकाचं पाऊल उचललं. लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केला  आहे. सावली तालुक्यातील  मनोहर गुरुनुले (6)2 आणि शारदा मनोहर गुरुनुले (50) यांचा लहान भाऊ धनराज गुरुनुले (52 ) यांच्या सोबत जमिनीवरुन सातत्याने वाद असायचा. 
 
हा वाद टोकाला गेला आणि दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणात धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांच्यावर जमीन खोदण्याच्या सब्बलने हल्ला केला. त्यात मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले तर शारदा गुरुनुले यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
 
दरम्यान, पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व त्यांनी आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले.