Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळून 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, 12 जण बचावले

Updated: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (10:26 IST)
 
शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोघांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्यानं जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. प्रस्तरारोहण करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील  तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवलं आहे. 
 
अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण 15 सदस्य हे हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. यात 8 मुली तर 7 मुलं होती. यातील मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्व शेंडीच्या डोंगरावर चढले. परतीच्या मार्गावर असताना यातील 8 मुली आणि 4 तरुण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंगमधून रोप काढत असताना बोल्डिंग सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले. यांच्यासोबत प्रशांत पवार देखील जखमी झाला. 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

रविवारी सेंट्रल-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू , अनेक गाड्या रद्द

LIVE: रविवारी सेंट्रल-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू

राज ठाकरे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा आरोप केला

संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली, भाजप मंत्र्याला अपशब्द म्हणत संताप व्यक्त केला

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा कायापालट होणार! केंद्र सरकारने ३५६ कोटी रुपयांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments