रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:17 IST)

कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही : संदीप देशपांडे

प्रभाग रचनेवरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन युतीचा विचार न करता कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
 
राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लोकं शिवसेनेवर नाराज आहेत. लोकांची मानसिकता शिवसेनेबरोबर जाण्याची नाही. त्यामुळे प्रभाग रचना बदलली असली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्यातरी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तरी आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कोरोना काळात मुंबईतील लोकांना खूप त्रास झाला. यावेळी सत्ताधारी शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली नाही. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत, असा दावाही देशपांडे यांनी यावेळी केला.