1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:32 IST)

परमबीर सिंग आणि ईडीच्या माध्यमातून ठाकरेंना बदनाम करण्याचे षडयंत्र : उदय सामंत

Conspiracy to defame Thackeray through Parambir Singh and ED: Uday Samant
शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उलट चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, ईडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम केले जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना उदय सामंत यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.
 
‘रमवीर सिंग यांनी जे काही आरोप केले आहे. त्यात काही तथ्य नाही. ईडीच्या चौकशीमध्ये कोणी कोणाचं नाव घेतलं आहे मला माहीत नाही. पण ईडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम केले जात आहे म्हणून काही अधिकारी किंवा किंवा त्यांची बदनामी करण्याची सुपारीच घेतली होती, त्याचाच हा भाग असेल. पण ईडी संदर्भात एखादी संबंधीत यंत्रणा काम करत असताना अधिक बोलणं योग्य नाही. पण उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना बदनाम करण्याचा डाव आहे, असं उदय सामंत म्हणाले.
 
न्यायालयाचा आदर केला पाहिजे. न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. न्यायालय आपली कारवाई करणार आहे. कोर्ट समोर तणाव वातावरण आहे. सगळ्यांनी संयमाने न्यायालयचा आदेशाचा आदर केला पाहिजे. गेल्या ८-१५ दिवसापासून जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि काल पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय, यांनी निकाल दिले होते. त्यात आधीन राहून राणे शरण गेले असतील. आता देदेखील जिल्हा न्यायालयात युक्तिवाद झाला. युक्तिवादानंतर न्यायालय निर्णय देईल, तो सगळ्यांना बंधनकार राहील, असं म्हणत सामंत यांनी राणेंना टोला लगावला.