1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 21 people have died so far due to heavy rains in Maharashtra

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

rain
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
 
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे आणि पहिल्याच पावसात नद्या, नाले आणि तलावांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तसेच, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा येथे वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण बुडाले, तर ६ जण जखमी झाले. जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जणांचा भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. तरं भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसीलमध्ये २ जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी आहे.
 
बुधवारी अनेक ठिकाणी पावसाचा वेग कमी झाला असला तरी, पाणी साचल्याने आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड कहर केला आहे आणि शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे.  
 
पुढील लेख
नेपाळमध्ये एका दिवसात ३ वेळा भूकंपाचा धक्का बसला