सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :वाशीम , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:41 IST)

मोसंबी ट्रक अपघातात 3 मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून एका आयशर टेम्पो मोसंबी घेऊन नांदेडकडे निघाला होता. टेम्पो हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर कलगाव पाटी जवळ आला असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आरजे-२१-जीए-५५३२) टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे, नागूलकर, रवीकांत हरकाळ, आकाश पंडीतकर, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी किरण यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले.