मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (15:07 IST)

3 वर्षांच्या चिमुरडीचा 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

संगमनेर येथील तीन वर्षाच्या अमायरा जोर्वेकरने सात भाषांमधून स्वत:चा परिचय करून सर्वांना आश्चर्यचकित करते. त्यामुळे तिच्या या बुद्धिमत्तेची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे. 
 
सह्याद्री शिक्षण संस्थेतील शिक्षक निखिल जोर्वेकर यांची मुलगी अमायरा ही देशातील विविध सात भाषांमधून न अडखळता स्पष्टपणे व खणखणीत आजावात आपला स्वत:चा परिचय करून देते. मातृभाषा मराठीसह ती हिंदी, इंग्रजी, कोकणी, गुजराती, पंजाबी व संस्कृत या भाषांतून ती स्वत:विषयी सर्व माहिती देते. त्यामुळेच तिच्या या अनोखा विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. 
 
यासाठी तिला तिची आई पूनम जोर्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या विक्रमाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतका लहान वयात इतक्या भाषा शिकणे, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.