गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उस्मानाबाद , शनिवार, 11 डिसेंबर 2021 (13:39 IST)

देव दर्शनाला जात असताना 12 भाविकांवर नियतीचं विघ्न

तुळजापूर -सोलापूर महामार्गावरील बार्शी रोड पुलावर क्रुझरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिेषण अपघात झाला. रात्री राडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात 1 भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहे.
 
सर्व जखमींवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. जालना जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील अकरा तरुण आणि घनसांगवी येथील एक तरुण असे एकूण 12 जण पंढरपूरला देवदर्शनासाठी क्रूझरने जात होते. पण वाटेत तुळजाभवानी देवीचं मंदिर असल्याने तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे जाण्याचा प्लॅन त्यांचा होता.
 
या घटनेची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमी भाविकांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेलं आहे.