1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (17:43 IST)

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

अलीकडील ऑनलाईन फसवणूक करून लुटण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. अमरावतीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची 31 लाख 35 हजाराची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 संशयित आरोपींना अटक केली आहे. आशिष बोबडे असे या फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

लवकर श्रीमंत होण्याच्या नादात आशिष बोबडे यांना काही लोकांनी शेअर बाजारात नेले त्यांना एका शेअर मार्केटच्या ग्रुप मध्ये सामील केले.ऑनलाईन लिंक क्लिक करून खाते तयार केले आशिष यांनी 31 लाख 35 हजार जमा करून शेअर्स खरेदी केले नंतर त्यांनी गरज पडली म्हणून पैसे काढण्याच्या प्रयत्न केला असता ती वेबसाईट बंद झाली. नंतर त्यांनी इतर लोकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी आपले सर्व नंबर बंद असल्याचे सांगितले. 

आशिष यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी ताबडतोब परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांना या प्रकरणात  तपासा दरम्यान सर्व आरोपींचे मोबाईल डिटेल्स गोळा केले  असता त्यात ते एकमेकांशी संवाद साधत असल्याचे समजले. 
आरोपींची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पाठवले होते. तसेच या बँकेची साखळी जोडत आरोपींनी छत्तीसगडातून वेगवेगळ्या बँकेच्या  खात्यात पैसे पाठवले. पोलिसांनी सर्व दहा आरोपींना अटक केली आहे.     
 
Edited by - Priya Dixit