रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (15:27 IST)

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स : 24 तासात 40 किमी रस्ता

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये महाराष्ट्र राज्याच्या रस्त्याची नोंद झाली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम केल्यामुळे या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.
 
महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचा देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  कौतुक करून अभिनंदन केले आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.  रविवार, 30 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून तब्बल 39.69  किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 24 तासांत सुमारे 40 किलोमीटरचा एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे. या कामाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ तासांत ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी केली असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही याची दखल घेतली आहे. विभागातील माझे सर्व सहकारी अधिकारी-कर्मचारी व कंत्राटदाराचे मी अभिनंदन करतो, असं ट्विट खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय.
 
त्यांनी म्हटलं की कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विभागाच्या कामगिरीचं कौतुक केलंय.
 
हा विक्रम अभिमानास्पद आहे. पण आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम नोंदवणे अधिक अभिमानाचे ठरेल. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे वापरून नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे व त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी दिले आहेत.