गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (17:26 IST)

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये विमानाची धडक बसून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. एमिरेट्स एअरलाइनने सोमवारी फ्लेमिंगोच्या कळपातून उड्डाण केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुबईहून येणारे फ्लाइट ईके 508 सुखरूप उतरले.
 
सदर घटना मुंबईतील पंतनगर मधील लक्ष्मीनगर परिसरात घडली असून सोमवारी रात्री उशिरा दुबईचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले

या घटनेमुळे मुंबई विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. दुबईसाठी एमिरेट्स फ्लाइट क्रमांक 509 आता मंगळवारी म्हणजेच आज रात्री 9 वाजता निघेल. प्रवाश्यांना विमान कंपनीने प्रक्रियेनुसार राहण्याची सोय केली आहे.
 
महाराष्ट्र वनविभागाने या घटनेचा तपास सुरू केला असून, ज्या ठिकाणी फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले त्या ठिकाणाहून अधिका-यांनी नमुने गोळा केले आहेत. वनविभागाचे आणखी एक पथक अमिरातीचे विमान उडवणाऱ्या पायलटचे बयाण नोंदवणार आहे.

अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एसव्ही रामाराव यांनी सांगितले की, आमची टीम घटनास्थळी आहे
फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या वैमानिकाने पक्ष्यांच्या धडकेची माहिती दिली त्याचे बयाणही आम्ही नोंदवू.
 
फ्लेमिंगोचा कळप ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याच्या दिशेने जात असताना विमानाची धडक बसली असल्याचे समजते.कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की बांधकाम किंवा प्रदूषणामुळे फ्लेमिंगोने त्यांच्या उड्डाणाचा मार्ग बदलला असावा.
 
Edited by - Priya Dixit