राज्यातील हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाख मदत
संपूर्ण भारत आज उद्विग्न आहे. सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. जम्मू व काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश आहे, असे सांगून या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत व कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकिस्तान आगळीक करत असून, त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे प्रतिपादित करून त्यांनी शहीद जवानांच्या प्रती आदरांजली व्यक्त केली.