सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (22:28 IST)

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जाेडणारे 52 शिक्षक निलंबित

52 teachers suspended for passing bogus disability certificate
बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या बावन्न शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई बीड जिल्ह्यात झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी हे आदेश काढले आहेत. या कारवाईमुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईमुळे बीडच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
बीड  जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या  ऑनलाईन प्रणालीव्दारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात 1572 शिक्षक पात्र होते. यातील 794 शिक्षकांनी आपण संवर्ग एकमध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले.
संवर्ग एकमध्ये गंभीर आजारी, दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा (school) मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने सीईओ अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची सुनावणी घेतली. यात 336 दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देवून तपासणी करण्यात आली. 336 शिक्षकांना पुर्नतपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामनंदतीर्थ वैद्यकिय शासकिय महाविद्यालय या शिक्षकांची सुनावणी घेतली.
दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये आणि दिव्यांग प्रमाणपत्र पुर्नतपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळुन आली. या तफावतीवरूनच 248 पैकी 52 शिक्षक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सीईओ अजित पवारांनी यांनी 52 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
 
तसेच त्यांची विभागीय चौकशीही लावली आहे, या चौकशी नंतर त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जाणार आहे, त्यामूळे खळबळ उडाली.दरम्यान आणखी 88 शिक्षकांचा अहवाल येणे बाकी असून त्यामध्ये 20 ते 25 बोगस प्रमानपत्रावाले शिक्षक मिळतील. अशी माहिती सीईओ अजित पवार यांनी दिली.
 
कारवाई झालेल्या बोगस शिक्षकांची नावे
 
धनंजय गोविंदराव फड (अंबाजोगाई, अल्पदृष्टी), रविकांत सुधाकर खेपकर (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), अशोक वामनराव यादव (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), चिंतामन तुकाराम मुंडे (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), राजू शंकर काळे (आष्टी, कर्णबधीर), वर्षा रामकिसन पोकळे (आष्टी, कर्णबधीर), राजेंद्र शिवाजी हजारे (आष्टी, कर्णबधीर), अमोल कुंडलिक शिंदे (आष्टी, अल्पदृष्टी), आनंद सिताराम थोरवे (आष्टी, अस्तिव्यंग), मनिषा उत्तमराव धोंडे (आष्टी, अस्तिव्यंग), देविदास भानूदास नागरगोजे (केज अल्पदृष्टी), आसाराम पांडूरंग धेंडूळे (गेवराई, अल्पदृष्टी), रमेश ज्ञानोबा गधे (गेवराई, अल्पदृष्टी), हनुमान यशवंत सरवदे (गेवराई, अल्पदृष्टी), सुधाकर दगडू राऊत (गेवराई, अस्तिव्यंग), अरूण भिमराव चौधरी ( गेवराई, अस्तिव्यंग), महादेव सखाराम जाधव (गेवराई, अस्तिव्यंग), मनोजकुमार अशोक जोशी (गेवराई, अस्तिव्यंग), मनोजकुमार मधुकर सावंत (गेवराई, अस्तिव्यंग), अनिता गोविंदराव यादव (गेवराई, अस्तिव्यंग), अर्चना भगवान इंगळे (धारूर, अस्थीव्यंग), शांताराम भानूदास केंद्रे (परळी, अल्पदृष्टी), मनोज नरसिंगराव सुर्यवंशी (परळी अल्पदृष्टी), दिपक भालचंद्र शेप (परळी, अल्पदृष्टी).
Edited by : Ratnadeep Ranshoor