शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (11:22 IST)

देव दर्शनाला जाताना भाविकांचा मृत्यू

Accident
बेळगाव- एका धक्कादायक घटनेत यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
बुधवारी मध्यरात्री सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भविकांचा भीषण अपघात झाला असून यात 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. रामदुर्ग तालुक्यातील चींचनुर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ हा अपघात घडला ज्यात वाहन झाडाला जाऊन आदळले. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रामदुर्ग तालुक्यातील हुल कुंद गावाचे असल्याचे सांगितले जात आहे. वाहनातून 23 जण प्रवास करत होते.
 
मृतकांचे नाव हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी आहेत.