गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (22:47 IST)

बांदा येथे स्कूटीसह महिलेला डंपरने फरफटत नेले स्कुटीने पेट घेतला महिला जिवंत होरपळली

accident
नववर्षानिमित्त दिल्लीतील कांजवाला येथे घडलेल्या वेदनादायक घटनेनंतर बुधवारी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गिट्टीने भरलेल्या डंपरने स्कूटीवरून जात असलेल्या कृषी विद्यापीठातील कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला  चिरडले. डंपरमध्ये अडकलेल्या स्कूटीने पेट घेतला. यात महिलेचा मृतदेह, स्कूटी आणि डंपर जळून खाक झाला. ही घटना शहर मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मवई बुजुर्ग बायपासजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

कृषी विद्यापीठातील कनिष्ठ कर्मचारी पुष्पा सिंग (वय 32), पत्नी स्व. रणजीत कुमार स्कूटीवरून भाजी खरेदी करून मवई बुजुर्ग चौराहा येथे जात होती. विद्यापीठाच्या गेटजवळ मागून येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडले. डंपरखाली स्कूटी अडकली. चालकाने सुमारे साडेतीन किलोमीटर महिलेला ओढत नेले. दरम्यान, डंपरच्या पुढील भागाला आग लागली. यावर चालकाने वाहन सोडून पळ काढला. महिला  आणि स्कूटी पूर्णपणे जळाली.

डंपरचा पुढील भागही जळाला. माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी घटनास्थळी पोहोचून कृषी विद्यापीठाच्या प्रवक्त्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राध्यापकांनी सांगितले की, 2020 मध्ये सहाय्यक लेखापाल म्हणून नियुक्त रणजीत कुमार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी पुष्पा यांची नियुक्ती करण्यात आली.
ती मूळची गोमती नगर (लखनौ) येथील असून त्यांना दोन मुले आहेत. दुसरीकडे या घटनेबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. स्पीड ब्रेकरसह सुरक्षा व्यवस्था असावी. नागरिकांकडून अशी  मागणी  केली जात आहे. 
 
Edited By - Priya Dixit