बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:29 IST)

एकाच कुटुंबातील आठ जणांवर एकत्र अंत्यसंस्कार. अपघात 12 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात नवीन वर्षात 1 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील आठ जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या समोदचे कुटुंब कुलदेवीच्या मंदिरात पूजा करून परतत होते. दरम्यान, सिकर खंडेला-पलसाणा रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भावांचे संपूर्ण कुटुंबच हादरून गेले.  
 
या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नऊ जण एकाच गावातील असून त्यापैकी आठ जण एकाच कुटुंबातील होते. या लोकांचा मृतदेह एकत्र निघाल्यावर  गावात खळबळ उडाली. हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य ज्याने पाहिले त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. चार वर्षांच्या निष्पाप ऋषभने आठ जणांना एकत्र मुखाग्नी दिली. तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
 
जयपूरच्या सामोद येथे राहणारे कैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब नवीन वर्षाच्या 1 जानेवारीला कुलदेवी जीण मातेच्या दर्शनासाठी गेले होते. 'देवी'चे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या वाहनाने सामोदकडे परतत होते. यादरम्यान, सीकरमधील सांडेला पलसाना रस्त्यावर, त्यांच्या कारने प्रथम दुचाकीला धडक दिली, नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit