1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (16:26 IST)

आईनेच पोटच्या तीन महिन्याच्या चिमुकलीला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले, मुलीचा मृत्यू

baby
माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुजरातच्या नाडियाड मध्ये समोर आली आहे. येथे एका निर्दयी मातेने आपल्याच पोटच्या तीन महिन्यांच्या आजारी मुलीला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून तिचा जीव घेतला. अहमदाबादमधील सिविल हॉस्पिटलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आरोपी आईला सोमवारी अटक करण्यात आली आहे.
 
अहमदाबादच्या असरवा भागात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली. सुरुवातीला आरोपी आईने मुलगी बेपत्ता असल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासले असता परिस्थिती स्पष्ट झाली. अमरीन असे मृत मुलीचे नाव असून ती गेल्या दोन आठवड्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी आई फरजान हिला ताब्यात घेतले आहे.   
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आई आपल्या मुलीला गॅलरीत घेऊन जाताना आणि नंतर रिकाम्या हाताने परत येताना दिसत आहे. यानंतर अमरीनचा मृतदेह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना तळमजल्यावर सापडला. चौकशी केल्यानंतर महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
 
याबाबत मुलीच्या वडिलांनी रविवारी शाहीबाग पोलिस ठाण्यात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. नोंदवलेल्या एफआयआरनुसार, मृत मुलगी जन्मानंतर लगेचच आजारी पडली. त्यामुळे त्यांच्यावर वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. जिथे तिला 24 दिवस दाखल करण्यात आले होते. मुलाचे वडील आसिफ यांनी पोलिसांना सांगितले की, वडोदरा येथील डॉक्टरांनी दूषित पाण्याच्या सेवनामुळे हा आजार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला 14 डिसेंबर रोजी नडियाद येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केल्याने तिने गुन्हा करण्याचं कबुली दिली. मुलगी आजारी असल्यामुळे तिला आजारापासून सोडवण्यासाठी तिने असं केल्याचे सांगितले.सध्या या प्रकरणातील आरोपी आईने आपला गुन्हा मान्य केला असून तिला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. 
 
Edited By- Priya Dixit