1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जून 2025 (11:45 IST)

धक्कादायक! महाराष्ट्रातील 7 हजार मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

anath
सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषा शिकवण्यावरून वाद सुरु आहे.अलीकडील काळात मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक मुलांना इंग्रजी शाळेत शिकायला पाठवतात. या मुळे मराठी शाळांमध्ये दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत आहे. राज्यभरात गेल्या काही वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने मराठी शाळा बंद पडल्याचे समोर आले आहे. 
मुंबईतील शाळा 16 जून पासून सुरु झाल्या असून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत 13 वर्षात महापालिकेच्या 13 शाळा बंद पडल्या आहे. शाळाच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील कमी आली आहे. 
राज्यातील 7,420 सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी झाली आहे. शिक्षण विभागाच्या जून 2025 च्या अहवालात हे उघड झाले आहे. 20पेक्षा कमी विद्यार्थ्यांमुळे या शाळा बंद होण्याची शक्यता असल्याने शिक्षक चिंतेत आहेत.
Edited By - Priya Dixit