सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:48 IST)

विदर्भातील शेतकऱ्यांच्या गेल्या सात महिन्यांत 810 आत्महत्या

suicide
अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या होत आहेत आहेत.
 
विदर्भात 810 आत्महत्यांपैकी सर्वांत जास्त अमरावती विभागात 612 झाल्या असून सुपीक समजल्या जाणाऱ्या नागपूर विभागात 198 शेतकऱ्यांनी मरण पत्करले आहे.
 
एकीकडे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, तर सरकारच्या निकषांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांला मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.
 
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकरिता 241 आत्महत्याग्रस्त कुटुंब पात्र ठरले आहेत आणि 213 अपात्र प्रकरणे ठरले आहेत, तर 356 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
 
मागील वर्षी अमरावती विभागात एक हजार 177 व नागपूर विभागात 380 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील वर्षीच्या तुलनेत या सात महिन्यातील आत्महत्या 50 टक्केपेक्षा जास्त आहेत. मागील वर्षांच्या एकूण आत्महत्यांपैकी नागपूर विभागातील आत्महत्येची 21 प्रकरणे अद्यापही चौकशीकरिता प्रलंबित आहेत.