रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बुलढाण्यात 90 कुत्रे मृतावस्थेत आढळले

बुलडाण्यातील गिरडा-सावलदबारा रस्त्याच्या कडेला जवळपास 90 कुत्रे मृतावस्थेत आढळले आहेत. या कुत्र्यांचे पाय बांधण्यात आले होते. 
 
"गिरडा-सावलदबारा रस्त्यावर पाच ठिकाणी 100 हून अधिक कुत्रे आम्हाला सापडले. त्यातील 90 हून अधिक कुत्रे मृतावस्थेत होते, तर काही जिवंत आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
कुजत असलेल्या मृतदेहांमधून दुर्गंधीमुळं हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि वनाधिकाऱ्यांना तातडीनं यासंदर्भात कळवलं. त्यानंतर जिवंत कुत्र्यांची सुटका करण्यात आली.
 
वनाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत कुत्र्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.