1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (16:06 IST)

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध

Great recruitment in Maharashtra police force
महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती जाहीर झाली आहे. ३४५० जागांसाठी ही भरती होणार असून, भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे. भरतीप्रक्रियेला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू आहे. २३ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईसाठी सर्वाधिक १०७६, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक ७२० जागांसाठी भरती होईल. https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.
 
गृह विभागाने यंदा पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती आहे. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे.नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.