मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (18:00 IST)

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला

आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, महाराष्ट्रातील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे पोलिसांनी गुरुवारी दोघांना मुलीच्या मृतदेहासह सोलापूर स्थानकावर गुजरातकडे जाणाऱ्या ट्रेनमधून अटक केली. आरोपी तेलंगणातील सिकंदराबाद शहरातून राजकोटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मृतदेहाची त्यांच्या गावी विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते. मुलीवर आधी तिच्या वडिलांनी लैंगिक शोषण केले आणि नंतर गळा आवळू खून केल्याचेही सांगितले जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुलीच्या 26 वर्षीय वडिलांनी 3 जानेवारी रोजी सिकंदराबाद येथील त्याच्या राहत्या घरी चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला होता. मुलीच्या आईचा या कृत्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. बराच वेळ मुलीची हालचाल होत नसल्याने ट्रेनमधील काही प्रवाशांना या जोडप्यावर संशय आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रेल्वे पोलिस यांनी सांगितले की, सहप्रवाशांनी ट्रेनमधील तिकीट कलेक्टरला याची माहिती दिली आणि नंतर सोलापूर स्थानकावरील रेल्वे पोलिसांनाही सतर्क करण्यात आले. दोघांना सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबविण्यात  आल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचीही माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यात आईनेही त्याला मदत केली होती.
ते म्हणाले की, कुटुंब त्यांच्या मूळ जागी मृतदेहाची विल्हेवाट लावू इच्छित असल्याने प्रकरण दडपण्यासाठी राजकोटला जाणार्‍या ट्रेनमध्ये चढले. सोलापूर रेल्वे पोलिस ठाण्यात या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांनाही अटक करण्यात आली आहे