गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2024 (16:27 IST)

नाशिकात 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

death
सध्या तरुणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. नाशिकात अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तेजस विठ्ठल आहेर असे या तरुणाचे नाव आहे. तेजस इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

सदर घटना नाशिकच्या लहवित गावात घडली आहे. तेजसचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे.तेजसने अलीकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. घरात निवांत बसलेला तेजस कुटुंबियांसह बसला होता. त्यावेळी अचानक तो चक्कर येऊन खाली कोसळला त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. 

तेजसचे वडील शेतकरी असून तेजस दहावीचा विद्यार्थी असून त्याचे स्वप्न आयटी इंजिनिअर होण्याचे होते. अल्पवयातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. एवढ्या कमी वयात तेजसच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

तज्ञ म्हणतात, चुकीची जीवनशैली, आहारात बदल, अनियमितता या गोष्टींमुळे आरोग्याचे नुकसान संभवते. त्यामुळे शारीरिक समस्यां उदभवतात. सततच्या बदलणाऱ्या दैनंदिक दिनचर्यामुळे ताण वाढतो आणि या सवयीमुळे हृदयविकार होतात. 
 
या साठी आहारात बदल करणे, आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्यांचा आहारात समावेश करणे, तेलकट तुपकट पदार्थ खाणे टाळणे, वजनावर नियंत्रण ठेवणे दररोज न चुकता व्यायाम करणे. ताण तणाव मुक्त राहिल्याने हृदय विकाराचा धोका टाळू शकतो. 
 
Edited By- Priya Dixit