रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (09:34 IST)

लातूर जिल्ह्यातील शेततळ्यात आढळली ९ फूट लांबीची मगर

 crocodile
निलंगा शहरातील उदगीर मोड परिसरातील शेतात शेततळ्यात  ८ ते ९ फूट लांबीची व सुमारे २०० किलो वजनाची मगर शेततळ्यात आढळून आली. त्यास रात्री दहा वाजता वन विभाग व आणि वन जीवरक्षक टीमने जेरबंद करून निलंगा येथील वन उद्यानातील तळ्यात रवाना केले . उदगीर मोड परिसरात येथील उद्योजक संजय हालगरकर यांच्या शेतात शेततळे असून दि १४ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास शेतात काम करणारे कासिम शेख यांना पाण्यात काहीतरी मोठा प्राणी असल्याचे संशय आला. यावरून त्यांनी वन जीव रक्षक टीमला संपर्क करून बोलावून घेतले.

जवळपास दोन तास पाण्यात निरीक्षण केल्यानंतर मगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर वन जीव रक्षक टीमने तात्काळ वन विभागाला पाचारण केले दुपारी तीन वाजल्यापासून या शेततळ्यातील पाण्याचा उपसा सुरू केला चार तास पाणी उपसा केल्यानंतर मगरीचे दर्शन झाले .अवाढव्य मगरीला बघून भल्या भल्यांच्या मनात भीती शिरली.

Edited By -Ratnadeep Ranshoor